परि अमृतातेही पैजा जिंके
विश्व स्वधर्म सूर्ये पाहो॥
बोलतो मराठी
अवघे विश्व तरावे
तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे
(1) अक्षरबाग वाचनालय म.सा.प.ने सुरू केले असून या तर्फे मुलांना घरपोच पुस्तके मिळू शकतील. दर शनिवारी या योजनेचा लाभ आपण घेऊ शकाल.
(2) बाल विकास केंद्र - मानसशास्त्रज्ञ जया बदी यांच्या मार्गदर्शनाखाली बाल विकास केंद्र म.सा.प.च्या माधवराव पटवर्धन सभागृहात 15 जून पासून आयोजित करण्यात येत आहे. मुलांमध्ये वक्तृत्व, नेतृत्व गुण वाढीस लागावेत तसेच त्यांच्यातील सर्जनशीलता वाढीस लागावी यासाठी या शिबिरात प्रयत्न केले जातील. तीन महिन्यांच्या या उपक्रमाचे देणगी मूल्य रु.1500/- असणार आहे. इच्छुकांनी म.सा.प.च्या टिळक रोडवरील कार्यालयात संपर्क साधावा. कार्यालयाची वेळ सकाळी 9।। ते 12 व सायंकाळी 5 ते 8 अशी आहे. दूरध्वनी क्रमांक - 020/24475963 किंवा 32545659
(3) सावित्रीबाई फुले अभ्यासिका - सावित्रीबाई फुले अभ्यासिका म.सा.प.ने सुरू केली आहे. याचा लाभ फक्त विद्यार्थीनींनाच घेता येईल. या अभ्यासिकेसाठी देणगीमूल्य प्रत्येक महिन्याचे रु.50/- असून
या संदर्भात काही अधिक माहिती आपणास हवी असल्यास कृपया म.सा.प.च्या कार्यालयाशी संपर्क साधावा.