परि अमृतातेही पैजा जिंके
विश्व स्वधर्म सूर्ये पाहो॥
बोलतो मराठी
अवघे विश्व तरावे
तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे
घ . नि , ४ उद्देश |
: |
मराठी भाषा व साहित्य यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी व विकासासाठी प्रयत्न करणे , मराठी भाषा व साहित्य यांच्या अभ्यासास उत्तेजन देणे , मराठी वाचकांची वाङ्मयीन अभिरुची वृद्धिंगत करणे आणि मराठी साहित्यिकांच्या हितासाठी व कल्याणासाठी झटणे हे परिषदेचे उद्देश आहेत. |
घ . नि , ८ (अ) |
: |
परिषदेचे उद्देश ,घटना व नियम मान्य असलेल्या १८ वर्षांवरील कोणाही व्यक्तीला संस्थेचे सभासद होता येईल. |
घ . नि , ८ (इ) |
: |
सभासत्वाच्या अर्जावर सूचक आणि अनुमोदक म्हणून परिषदेच्या कोण्त्याही २ (दोन) आजीव सभासदांच्या सह्या असणे आवश्यक आहे. |
घ . नि , ८ (ए) |
: |
अर्ज मिळाल्यापासून एक महिन्यात सभासदत्वाबद्दल अर्जाचा निर्णय अर्जदारास कळविण्यात येईल. |
घ . नि , ८ (ऎ) |
: |
वार्षिक साधारण सभासदांनी दरवर्षी एप्रिल ते जुलै या काळात वर्गणी भरावयाची आहे. जुलैअखेरपावेतो वर्गणी न आल्यास सभासदत्व आपोआप रद्द होईल. |
घ . नि , ९ हक्क |
: |
सर्व सभासदांना परिषदेचे 'म . सा . पत्रिका' हे त्रैमासिक विनामूल्य पाठविण्यात येईल . पंचवार्षिक निवडणुकीत मतदानाचा किंवा उभे राहण्याचा हक्क राहील , ब . भा . म . सा . मंडळाच्या संमेलनाचे प्रतिनिधी होता येईल , ग्रंथालयाचा वा अतिथीगृहाचा नियमांनुसार लाभ घेता येईल . |
|
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सध्याच्या घटनेची प्रत कार्यालयात विकत मिळू शकेल . (देणगी मूल्य रु.१०/- फक्त) |
||
(1) |
उपकर्ते |
- |
रु. दहा हजार किंवा त्यापेक्षा अधिक देणारे |
(2) |
आश्रयदाते |
- |
रु.पाच हजार ते दहा हजारपर्यंत देणारे |
(3) |
साहाय्यक |
- |
रु. तीन हजार ते पाच हजारपर्यंत देणारे |
(4) |
हितचिंतक |
- |
रु. दोन हजार ते तीन हजारपर्यंत देणारे |
(5) |
आजीव |
- |
रु. एक हजार किंवा दोन हजारपर्यंत देणारे |
(6) |
वार्षिक साधारण |
- |
वार्षिक साधारण दरवर्षी रु.शंभर देणारे |
|
(१ ते ५ या वर्गांतील सभासद आजीव म्हणून गणले जातील.) |
|||